मुरबाडच्या भात खरेदी-विक्रीसंघामधुन शेतकऱ्याची पिळवणुक थांबवण्याची मागणी – eNavakal
महाराष्ट्र

मुरबाडच्या भात खरेदी-विक्रीसंघामधुन शेतकऱ्याची पिळवणुक थांबवण्याची मागणी

मुरबाड  – मुरबाड तालुक्यातील भात खरेदी-विक्री संघामध्ये शेतकऱ्याची  होणारी पिळवणुक थांबवण्यासाठीचे निवेदन मुरबाड तहसिलदार यांना देण्यात आले. कॉंग्रेसचे  जिल्हाध्यक्ष सुरेश टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या शिष्ठमंडळाने जिल्हासरचिटणीस इंजिनिअर चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग नरेश मोरे, अनिल चिराटे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष भरत मुरबाडे, असिफ अत्तार, शेतकरी प्रतिनिधी दिलीप आगिवले आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिले.

शेतकऱ्याची भाताची पोती खरेदी विक्री संघात आणल्यानंतर त्यांना टोकण दिले जाते मात्र अनेक दिवस फेऱ्या मारुन देखील त्यांचा नंबर लागत नाही मात्र खाजगी व्यापाऱ्याचा  भात पहाटे खरेदी केला जातो अशी चर्चा शेतकरी वर्गामध्ये आहे. सदरील प्रकारामुळे शेतकरी नाईलाजास्तव भात दलालांना कमी भावात विकतात व तोच भात दलाल संघामध्ये प्रचंड नफ्यामध्ये विकतात. प्रधानमंत्रीच्या दलाली व नफेखोरी कमी करण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासण्याचे काम मुरबाड तालुका भात-खरेदी विक्री संघाचे लोक करत असल्याचा आरोप इंजिनिअर चेतनसिंह पवार यांनी केला व  शेतकऱ्याची होणारी पिळवणुक तात्काळ थांबवुन कारवाईची मागणी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबई- कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृष्य वस्तूचा काल मध्यरात्री रोडपाली परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. शाळेसमोर बॉम्बसदृष्य...
Read More
post-image
News देश

केंद्राने 15 भ्रष्ट आणि कामचुकार अधिकार्‍यांना दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली-  मोदी सरकारच्या कामकाजाला सुरुवात होऊन अजून एक महिना झालेला नाही. तोच सरकारने कडक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आयकर विभागानंतर केंद्र सरकारने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More