मुदतवाढ नको! त्याच शाखेत प्रवेश हवा – मराठा विद्यार्थी – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

मुदतवाढ नको! त्याच शाखेत प्रवेश हवा – मराठा विद्यार्थी

मुंबई – वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर प्रवेशाचा प्रश्‍न चिघळला आहे. त्यामुळे आझाद मैदानात सुरू असलेले या विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकणार आहे. महाराष्ट्र सरकारने या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना थातूरमातूर दिलासा देण्यासाठी आज परिपत्रक काढून वैद्यकीय प्रवेशाला सात दिवसांची स्थगिती देऊन मराठा विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी अकरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मात्र मराठा विद्यार्थ्यांना ही मुदतवाढ नको आहे. त्यांना यापूर्वी मराठा आरक्षणाच्या कोट्यातून मिळालेल्या कॉलेजात आणि त्याच शाखेत प्रवेश हवा आहे. त्यामुळे फडणवीस सरकारची पाचावर धारण बसली आहे.

सरकारने आपले घटनादत्त अधिकार वापरून आम्हाला यापूर्वी मिळालेले प्रवेश कायम ठेवावेत, अशी या मराठा विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यांचा फेरप्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायला विरोध आहे. आम्हाला मराठा आरक्षणांतर्गत मिळालेल्या प्रवेशानुसार आम्हाला हवी ती मेडिकल कॉलेज व वैद्यकीय फॅकल्टी (शाखा) मिळाली. सरकारने आमचे हे प्रवेश कायम ठेवावेत. कारण आम्ही प्रवेश बरहुकूम त्या त्या कॉलेजात रुजू होऊन दहा-दहा दिवस झाले आहेत. आमच्या त्या त्या कॉलेजच्या मस्टरवर सह्यादेखील झाल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आमचे प्रवेश, कॉलेज आणि शाखा सर्वच रद्द झाले. सरकारने आपले विशेषाधिकार वापरून जुने प्रवेश कायम ठेवावेत, अशी मागणी हे मराठा वैद्यकीय विद्यार्थी करीत आहेत.
हे विद्यार्थी आंदोलन कायम ठेवणार आहेत. ते आजही आझाद मैदानात धरण्यावर बसले आहेत. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांपासून मराठा संघटनांचे नेते काय करावे ते सुचत नसल्याने आझाद मैदान, वर्षा, शिवनेरी असा फेर्‍या मारीत आहेत.
महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणांतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश रद्द करताना महाराष्ट्र सरकारला त्यांचे घटनादत्त अधिकार वापरून हे प्रवेश कायम करता येतील, अशी टिप्पणी केली आहे.
मराठा समाजाच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सोशल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्‍लास (एसईबीसी) कायद्याच्या कलम 17 (1) अन्वये अध्यादेश काढून आमचे यापूर्वी झालेले प्रवेश कायम करावेत. हा अध्यादेश सहा महिने चालेल. त्यामुळे हे वैद्यकीय शिक्षणाचे वर्ष पार पडेल. तोपर्यंत पुढच्या वर्षीपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णय येईल.
महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडीकल विभागातील कोणत्याही विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्यापूर्वी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. नागपूर खंडपीठाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मराठा समाजाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे अगोदर मिळालेले प्रवेश रद्द झाले. म्हणूनच हा विषय चिघळला आहे. आता मराठा समाजाच्या मुंबईत अनेक बैठका पार पडत आहेत. प्रत्येकजण आजचे मरण उद्यावर ढकलू पहात आहे. मात्र सरकारची नियत साफ नाही. मराठा विद्यार्थ्यांनी वैद्यकीय फेर प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला नाही व मिळेल ते कॉलेज व मिळेल ती शाखा घेतली नाही तर त्यांचे वैद्यकीय शिक्षणच धोक्यात येण्याची भीती आहे.

विद्यार्थ्यांना धोका

विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुन्हा अर्ज केला नाही आणि आधीचाच प्रवेश वैध राहावा असा आग्रह धरला असला तरी त्यांची डिग्री बेकायदा ठरण्याचा धोका उद्भवू शकतो. शासनाने अध्यादेश काढत विद्यार्थ्यांना एक वर्ष तारले तरी शेवटी या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. जर न्यायालयाने आताचे प्रवेश अंतिमत: बेकायदाच ठरविले तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावरही प्रवेश बेकायदा ठरल्याने डिग्री बेकायदा ठरण्याचा धोका आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More