मुख्यमंत्र्यानी पडद्याआडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर सेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील – रामदास कदम – eNavakal
News महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यानी पडद्याआडून नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर सेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील – रामदास कदम

भाजप आता आमचा एक नंबरचा शत्रू  – रामदास कदम                                                                                                                                                                                                                                रत्नागिरी – भाजप हा आता एक नंबरचा शत्रू आहे,आणि या भाजपला इथून हद्दपार करण्यासाठी कोकणातील आम्ही सर्व नेते एकत्र आलो आहोत असं म्हणत शिवसेनेनं कोकणात आज निर्धार मेळावा केला .गेल्या अनेक वर्षात एकाच व्यासपीठावर न दिसलेले शिवसेनेचे कोकणातील नेते निर्धार मेळाव्यात एकत्र पाहायला मिळाले. आजच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेने भाजप आणि नारायण राणे यांना लक्ष करताना नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना अखेर पर्यंत कोकण वासीयांसोबत राहील अशी घोषणा केली.
2009 नंतर प्रथमच केंद्रीय मंत्री खासदार अनंत गीते आणि रामदास कदम कोकणात पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आले . रामदास कदम यांनी आपल्या भाषणात ज्या भाजपला आम्ही लहान भावासारखा वागवलं त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याने भाजपचं आमचा एक नंबरचा शत्रू असेल असे सांगताना मुख्यमंत्री यांनी पडद्या आडून कोकणात नाणार प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर सेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील आणि कोकण वासीयांना घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला.
आजच्या मेळाव्यात रामदास कदम, अनंत गीते यांनी आमच्यातले सर्व मतभेद आणि गैरसमज दूर झाले असून ज्यांनी आमच्यात भांडंण लावली त्यांना अम्ही पळवून लावले आहे असं सांगताना नारायण राणेंना लक्ष केलं.राणेंचा स्वाभिमान आता गेला कुठे असा सवाल करत खासदारकीसाठी राणेंना मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांचे पाय चाटत जावे लागले असं म्हणत नारायण राणेंवर टीका केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More
post-image
महाराष्ट्र

हवेली तालुक्यात अशीही अफवा, सिहगडच्या जंगलात कोरोना रुग्ण

पुणे – जिल्ह्यातील हवेली तालुक्यात काही गावांमध्ये अशी अफवा पसरली की त्यामुळे ही गावे रात्रभर जागी राहिली. पुण्यातील रुग्णालयातून पळालेले ४-५ कोरोनाबाधित रुग्ण सिहगडच्या...
Read More