मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

पंढरपूर – परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावचे वारकरी विठ्ठल चव्हाण व प्रयाग चव्हाण या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं हा पूजा विधी पार पडला.

पूजेनंतर मुख्यमंत्र्यांना अनेकांनी विचारले की काय मागणे मागितले, त्यावर ‘विठ्ठलाकडे काय मागणार, तो मनातील जाणतो. तरीही मनातील हूरहूर विठ्ठलाकडे मांडली. माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय तो सुखी व्हावा, बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर मंदिर समिती व मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. आज अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक वारी सुरू आहे. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला आहे. काम मोठे आहे पण पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पंढरपुरात आलो की एक सकारात्मक वातावरणाचा भास होतो. गेल्या वर्षी काही कारणामुळे पंढरीत विठ्ठलपूजा करता आली नाही, याची खंत नाही. कारण कदाचित विठ्ठलाच्या मनातच असावे, यामुळे मुंबईतच वर्षा बंगल्यावर विठ्ठल पूजा करण्याचे भाग्य मिळाल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच विठ्ठलरूपी जनतेची पाच वर्षे पूजा करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे. ती संधी पुन्हा मिळेल,’ अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More