मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने १७६७ कोटींचा घोटाळा – कॉंग्रेस – eNavakal
आघाडीच्या बातम्या मंत्रालय महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने १७६७ कोटींचा घोटाळा – कॉंग्रेस

मुंबई  – नवी मुंबईतील रांजणपाडा गावातील सिडकोच्या अखत्यारीत असलेली मोक्याची 24 एकर जमीन खाजगी बिल्डरच्या घशात घातली गेली असून या व्यवहारात तब्बल सतराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आज काँग्रेसकडून करण्यात आला. नगरविकास विभाग मुखमंत्र्यांकडे असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाचा यात थेट संबंध असल्याचा आरोप काँग्रेसच्यावतीने राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला असून या सर्व व्यवहाराच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही त्यांनी यावेळी केली.

सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आठ शेतकरी कुटुंबांना 26 फेब्रुवारी 2018ला नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाजवळ रांजणपाडा गावातील 24 एकर जमीन देण्यात आली. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनंतर 14 मे 2018 रोजी ही जमीन पॅराडाईज बिल्डर या प्रकल्पग्रस्त कुटुंबियांकडून खरेदी करतो. विशेष म्हणजे कोटयावधी रुपये किंमतीची ही जमीन 15 लाख रुपये प्रति एकर या कवडीमोल भावाने खरेदी केली जाते. आजच्या बाजारभावाने या जमिनीची किंमत 1767 कोटी एवढी होत असून ही जमीन पॅराडाईज बिल्डरचे मनीष भतीजा आणि संजय भालेराव अवघ्या तीन करोड साठ लाखांना खरेदी करतात. हा सगळा व्यवहार संशयास्पद असून यात सरकारच्या महसुलाचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याची टीका आज काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्राच्या ‘क्लीन चिट’ मुख्यमंत्र्यानी या भ्रष्टाचाराबाबत उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.

सिडकोच्या अखत्यारीत असलेली जमीन थेट धरण प्रकल्पग्रस्तांना देणे, नंतर तीन महिन्यांनी छोटी किंमत देऊन खाजगी विकासकाने जमीन अक्षरशः गिळंकृत करणे, एका दिवसांत सगळा व्यवहार होणे यावरून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच मीही नगरविकास खाते सांभाळले असून एवढा मोठा व्यवहार राजाश्रयाशिवाय होऊ शकत नाही, असे म्हणून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे अंगुलीनिर्देश केला. या प्रकारावर काँग्रेस मुखमंत्र्यांना सभागृहात जाब विचारेल, असे चव्हाण म्हणाले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More