मुख्यमंत्री शिवसेनेचाच! उद्धव ठाकरे ठाम – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

मुख्यमंत्री शिवसेनेचाच! उद्धव ठाकरे ठाम

मुंबई – राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आज द रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व आमदारांची बैठक घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. या बैठकीत ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’, असे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे समजते आहे. तसेच ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेकडून अजूनही ५०-५० चा विचार सुरू आहे का, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, भाजपाला राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले आहे. त्यांना वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र तेथील अडचणी लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील ‘द रिट्रीट’ हॉटेलमध्ये केली. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत शिवसेना आमदारांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असल्याचे समजते आहे. त्याठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गजानन कीर्तिकर, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर, अनिल देसाई यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमध्ये आमदारांची भेट घेतली आणि आदित्य ठाकरेंनी त्याठिकाणीच मुक्काम केला. आज उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांशी संवाद साधला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असताना शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More