मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट म्हणजेच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य पिंजून काढणार आहेत. यात्रेदरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देऊन आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही मुख्यमंत्री भेट घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत.

दरम्यान, आज रविवार २१ जुलै रोजी गोरेगाव येथील नेस्को संकुलात भाजपा प्रदेश कार्यसमितीची विशेष बैठक पार पडत आहे. या बैठकीचे उद्घाटन कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते उपस्थित आहेत.

आज बैठकीपूर्वी जे. पी. नड्डा यांनी चैत्यभूमी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ येथे जाऊन अभिवादन केले. त्यानंतर १० वाजता ते बूथ सदस्यता कार्यक्रमात सहभागी झाले.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More