मुख्यमंत्री फडणवीस हिंदुत्त्वविरोधी, सनातनचा आरोप – eNavakal
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस हिंदुत्त्वविरोधी, सनातनचा आरोप

मुंबई – सनातन परिवारातील घटक असलेल्या हिंदू विधीज्ञ परिषदेने आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केले. आरएसएसशी नाते सांगणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्त्वविरोधी असल्याचा आरोप आज हिंदू विधीज्ञ परिषदचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी केला.

दाभोलकर-पानसरे प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदु युवकांचा पोलीस कोठडीत अमानुष छळ होत असल्याचा आरोपही यावेळी पुनाळेकर यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच नंदकुमार नायर व तिरुपती काकडे यांच्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी हिंदु युवकांचा पोलीस कोठडीत अमानुष छळ करत असल्याचा आरोप आज पुनाळेकर यांनी करून एकच खळबळ उडवून दिली. नंदकुमार नायर या पोलीस अधिकार्‍याने तर सचिन अंदुरे याला ’तुझा बचाव करणार्‍या वकिलांचेच नाव खुनाचा सूत्रधार म्हणून सांग’, असे सांगून त्याच्यावर प्रचंड दबाव आणला. त्याचबरोबर ’मी सांगतो तसे कबुल कर नाहीतर तुझ्या पत्नीवर बलात्कार करीन’, अशी धमकीही दिल्याचे पुनाळेकर यांनी सांगितले. नायर व काकडे हे दोन्ही पोलीस अधिकारी या तरुणांना वारंवार ‘आम्हाला फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आहे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आमच्या खिशात आहेत’, असे सांगतात अशी माहिती यावेळी पुनाळेकर यांनी दिली.

माझे वडील आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. आईने त्याकाळात खुप त्रास सहन केला, असे सांगून लोकांची सहानुभूती मिळवण्यात हे मुख्यमंत्री पटाईत आहेत. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवर आता आमच्या तरुणांवर जसे हे पोलीस अधिकारी अत्याचार करतात तसे तर काही केले नाही असे सांगून पुनाळेकर यांनी काँग्रेसपेक्षा हे फडणवीस सरकार घातक आहे, असे सांगितले. त्यांना अत्याचाराची चीड असती तर त्यांनी आता असा छळ केला नसता. या मुख्यमंत्र्यांचा इतिहास काढला तर ज्या पोलीस अधिकार्‍यांनी हिंदुत्त्ववाद्यांना त्रास दिला त्याच अधिकार्‍यांना या मुख्यमंत्र्यांनी पदोन्नती दिल्याचे दिसते. साध्वी प्रज्ञा सिंग यांचा छळ करणारा परमबीर सिंग असो वा संभाजी भिडेंवर हात उगारणारा कृष्णप्रकाश असो किंवा अधिकारपदावर असताना सत्यपालसिंग असो हे सगळे अधिकारी आज उच्च पदावर आहेत. सत्यपालसिंग तर मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी सहा वर्षांपूर्वी झालेल्या रझा अकादमीच्या मोर्चाप्रकरणी अजून केसही चालू झाली नाही. या प्रकरणातील बाबा बंगाली तर मुखमंत्र्यांचा मित्र आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा-मराठेतर, दलित-दलितेतर असे वाद लावून दंगे भडकवायचे आहेत, असा सनसनाटी आरोपही पुनाळेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री कधीही सिलेक्टिव्ह कारवाई करतात. कोरेगाव-भिमा दंगलीत ज्या राहुल फटांगळे या निष्पाप युवकाला ज्याने मारले त्या मारेकर्‍याचे नाव सांगण्याचे धैर्य मुख्यमंत्री दाखवतील काय, असा सवालही त्यांनी केला. या सगळ्या प्रकरणांमध्ये सनातन संस्था व हिंदुत्त्ववादी संघटनांचा सॉफ्ट टार्गेट म्हणून वापर होतोय. या मोठ्या राजकारणी लोकांच्या महाभयंकर कारस्थानाचा आम्ही बळी ठरतोय, असाही आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणी सर्व कारस्थाने उघड व्हायची असतील तर पोलीस अधिकारी, आरोपी, आरोपींचे वकील या सर्वांचीच ‘नार्को चाचणी’ केली जावी, अशीही मागणी त्यांनी केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More