मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य – eNavakal
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र प्रमुखांच्या आयोजित केलेल्या बैठकीत केले. तसेच भाजपामध्ये आलेल्यांची निष्ठा तपासा, अशा शब्दात खडसेंनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पक्षात येणार्‍यांच्या निष्ठेबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याशी मी सहमत आहे. पक्षात येणार्‍यांची निष्ठा तपासल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्यायही होणार नाही. तसेच पक्षात येणार्‍यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही केले आहेत. त्यामुळे त्यांनाच पक्षात घेणे हे चुकीचे असल्याचे खडसे म्हणाले. तसेच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे आणि पक्षाकडे मीच उमेदवारीची मागणी करणार असल्याचेही एकनाथ खडसे यांनी
यावेळी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More