मुकेश अंबानी कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या चरणी – eNavakal
News मुंबई

मुकेश अंबानी कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या चरणी

मुंबई- रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनंत अंबानीही होता. या दोघांनीही आकाश या त्यांच्या मुलाची लग्न पत्रिका गणपतीच्या चरणी अर्पण केली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. श्लोका मेहता या हिरे व्यापारी रसेल मेहतांच्या मुलीशी आकाश अंबानीचे लग्न होणार आहे. 9 मार्चला हे दोघे लग्न करणार आहेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. 11 मार्चला मोठे रिसेप्शनही होणार असल्याचे समजते आहे. याच लग्नाची पहिली पत्रिका मुकेश आणि नीता अंबानी यांनी सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवली आणि कार्य निर्विघ्न पार पडावे अशी प्रार्थना केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More