मुंबर्ईतील सर्व पुलांचे नव्याने ऑडीट करा – eNavakal
News मुंबई

मुंबर्ईतील सर्व पुलांचे नव्याने ऑडीट करा

मुंबई- परळ -एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेगरी आणि अंधेरीतील पूल दुर्घटना भविष्यात होऊ नये याची खबरदारी घ्या. या दुर्घटनांची जबाबदारी एकमेकावर टाकण्यापेक्षा सर्वानी मिळून एकत्र या आणि मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने ऑडीट करा, असे निर्देश न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकार , महापालीका आणि रेल्वे प्रशासनाला दिले.

परळ -एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेगरी प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करा. अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाणेचे विक्रात तावडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झाली. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्र सरकारतर्फे अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल, अ‍ॅडव्होकेट जनरल, रेल्वेचे वकील या सर्वांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सॉलीसीटर जनरल अनिल सिंग, जनरल, अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी न्यायालयात हजर होते. यावेळी न्यायालयाने या दुर्घटनांची गंभीर दखल घेतली. अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या, असा सल्ला दिला. सर्वच पुलाचे ऑडीट करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील वाढती गर्दी, ट्राफीक आणि पार्कींगची समस्यांचा परामर्श घेतला.नवी मुंबई प्रमाणे आणखी एका नव्या शहराची निर्मीती करण्याची वेळ आली आहे. असे मत व्यक्त केले.त्या दृष्टीने सर्वांनी एकत्रीत येऊन पुढे 100 वर्षाचे नियोजन करा. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा असाही सल्ला न्यायालयाने देऊन याचिकेची सुनावणी तीन आठवडे तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

केंद्रीयमंत्री अनुप्रिया पटेलने भाजपाची साथ सोडली

लखनऊ – केंद्रीय मंत्री व अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी भाजपाची साथ सोडली आहे. भाजपाने आमच्या सहकार्‍यांना सांभाळून घेतले नाही. आमच्या तक्रारीचे निरसन...
Read More
post-image
News देश

सराफांच्या भिशीवर बंदी सरकारने अध्यादेश काढला

नवी दिल्ली- दाग-दागिने विकणार्‍या सराफांच्या भिशीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसा अध्यादेशच आज सरकारने काढला. या अध्यादेशान्वये सराफ चालवत असलेल्या अल्पबचत योजनेवर बंदी...
Read More
post-image
News मुंबई

शक्ती मिल बलात्कार प्रकरण! हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यात फाशी नाही, तर बलात्कारात का?

मुंबई- एखाद्याची हत्या करणे अथवा शरीराचा एखादा भाग धडापासुन वेगळा करणे अशा अमानवी स्वरूपाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षेची तरतूद नाही . त्या मुळे हत्ये पेक्षा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईत बीएसएनएलची इंटरनेट सेवा ठप्प

वसई – बीएसएनएलच्या इंटरनेटचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे वसईतील दस्त नोंदणी रखडत चालली असून त्याचा फटका मात्र दररोज नोंदणी कार्यालये व त्याच्या लाखो...
Read More
post-image
News मुंबई

पालिकेचा केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ पुरस्काराने सन्मान

मुंबई – पालिकेद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या विविध सेवा सुविधा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, विविध परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा सुविधा माहिती...
Read More