मुंबई, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापुरात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस – eNavakal
News मुंबई हवामान

मुंबई, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापुरात सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पाऊस

रत्नागिरी – मुंबई, रत्नागिरी, कोल्हापुर, ठाणे, कल्याण-डोबिवलीमध्ये आज सायंकाळी सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाने हजरी लावली. त्यामुळे तेथील परिसरातील हवेत गारवा निर्माण झाला होता. येत्या काही तासांत अजून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून नागरिकांना आपली काळजी द्यावी, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बदलापुर. डोबिवली येथे पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. कुलाबा, सांताक्रूझ परिसरात वादळी वार्‍यासह कोसळला. नवी मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली होती. गिरगाव, परळ, लालबाग, दादर या भागात पाऊस कोसळला. परत्नागिरीतील जयगड, गुहागर. देवरुख, चिपळूण, संगमेश्वर येथीलदेखील पाऊस पडला आणि या जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एकूण 285 मिलीमीटर पाऊस पडला असून सरसरी 31 .89 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दापोलीतील मौजे खेपी येथे राजाराम बर्गे यांच्या शेतकी गायाचा पावसामुळे मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यात मौजे आंबववाडी येथे यशवंत केपडे यांच्या गोठ्यावर अशंत: 20 हजार रुपयाचे नुकसान झाले असून कोणतीही जिवीतहानी झाली नाही. आज दुपारी कोल्हापुरच्या पन्हाळगड, चंदगड, गारगोटी येथे वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी पडला. तेथील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर सातार्‍यात कराड,माण,खटाव, फलटण, कोरेगाव आणि हाबळेश्वर आणि वाई तालुक्यात काल दमदार पाऊस पडला. वाईतील बदेवाडी येथे बाभंळीचे मोठे झाड महावितरणाच्या हाय टेंन्शन तारांवर पडल्याने विद्यृत पुरवठा खंडित झाला होता.
पुण्यातील चिंबळी परिसरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरण काही काळ थंड होते. दरम्यान, आज सकाळपासूनच उकडत होते. त्यातच दुपारी तीनच्या सुमारास ढगाळ हवामन झाले अन् विजेच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, चिंबळी परिसररातील शेतकरी उन्हाळी हंगामतील भुईमूग व बाजीची काढणी करीत असताना पावसाने हजेरी लावल्याने त्यांची तारांबळ उडाली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More