मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद – eNavakal
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेकडून काही दिवसांपूर्वी औषध पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. पुरवठादारांपैकी मेडिको प्रा. लि. या कंपनीने औषध पुरवठा उशिरा केला होता. त्याबदल्यात १५ लाख रुपयांचा दंडही भरला. मात्र तरीही पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यामुळे टेंडरचे सर्व नियम पाळूनही औषध पुरवठादारांना महापालिकेकडून काळ्या यादीत टाकण्यात येते, असा ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनचा आरोप आहे. फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी काल यासंदर्भात आयुक्तांची भेटही घेतली. मात्र आयुक्त औषध पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्याच्या निर्णयावर ठाम राहिले त्यामुळे आजपासून ४४ औषध पुरवठादार कंपन्यांकडून मुंबई महापालिका रुग्णालयांना औषधे न पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी ४३.७०% मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More