मुंबई तापली! तापमानाने गाठली ‘बे’चाळीशी – eNavakal
News मुंबई हवामान

मुंबई तापली! तापमानाने गाठली ‘बे’चाळीशी

मुंबई – संपूर्ण राज्यात तापमानात कमालीची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचा एप्रिल आणि मे महिना बाकी असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. तर अ मुंबईत तापमानाने बेचाळीशी पार केली. तापमानात अचानक वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम झाले होते.
उन्हाळ्याचा एप्रिल आणि मे महिना अजून बाकी आहे, मात्र तापमानाने मार्चमध्येचा चाळिशी ओलांडली आहे. ठाण्यात रविवारी 44.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर रायगडमध्ये भिरा येथे 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे किंवा उन्हापासून संरक्षणासाठी डोक्यावर टोपीचा वापर करावा, डोळ्यावर गॉगलचा वापरावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More