मुंबई, गुजरातवरील ‘वायू’चा धोका टळला – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र हवामान

मुंबई, गुजरातवरील ‘वायू’चा धोका टळला

मुंबई – अरबी समुद्रात घोंगावणारे ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार आणि याचा तडाखा मुंबईसह कोकणाला बसणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या पावसामुळे काल दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका सोसावा लागला. मात्र आता चिंता टळली आहे कारण या चक्रीवादळाने दिशा बदलली असून ते गुजरातला धडकणार नाही आहे. तसेच मुंबईवरील धोकाही टळला आहे. हे वादळ अरबी समुद्रातच घोंघावणार असून १५० ते १८० ताशी वेगाने वारे वाहणार आहेत.

दरम्यान, मुंबई, कोकणातील समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांना या वादळाची धास्ती होती. ती टळली असली तरीही वायू सतत दिशा बदलत असल्याने खबरदारी म्हणून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्तही करण्यात आला आहे. तसेच काल वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ एका ज्येष्ठ पादचाऱ्याचा होर्डिंग डोक्यात पडून मृत्यू झाला. तर अनेक झाडे उन्मळून पडली आणि तब्बल ४०० विमानांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. दरम्यान, सध्या राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळत असून मान्सूनचे आगमन लांबले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ‘तेजस’ भरारी

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करत आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज पंतप्रधान मोदींच्या सभेने महाजनादेश यात्रेचा समारोप

नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने होणार आहे. आज सुपारी १२ वाजता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More