मुंबई उपनगरांत विजांच्या कडकडाटासह पावसाचे धुमशान – eNavakal
News महाराष्ट्र

मुंबई उपनगरांत विजांच्या कडकडाटासह पावसाचे धुमशान

मुंबई- परतीच्या पावसाने राज्यातील काही शहरांमध्ये चांगलाच जोर धरला आहे. मुंबईत सायंकाळच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले होते. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, पनवेल, बोरिवली, कांदिवली येथे विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमशान सुरु केले. उद्या रविवारीही राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार हा पाऊस पडतोच आहे. आज सायंकाळी सहाच्या सुमारास ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, पनवेल, बोरिवली, कांदिवली येथे विजांच्या कडकडाटासह मुसळदार पावसाने हजेरी लावली. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. उद्या रविवारी मुंबईसह, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More