मुंबई – शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपरकिंग्सला एका धावेने पराभूत केले आणि आयपीएल स्पर्धेत विजेतेपदाचा चौकार लगावला. अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली. कर्णधार रोहित शर्माच्या टीमने चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरल्यानंतर मुंबईत आज ‘विजयरथा’वरून त्यांची मिरवणूक निघणार आहे. मुंबई इंडियन्सच्या मालक असलेल्या नीता अंबानी यांच्या अॅटिलिया या घरापासून ते ट्रायडंट हॉटेलपर्यंत ‘बेस्ट’च्या ओपन बसमधून विजयी मिरवणूक सायंकाळी साडे सहा वाजता निघणार आहे.
