मुंबईमधील धोकादायक इमारतींसाठी महापालिका राबवणार वेगळे धोरण   – eNavakal
मुंबई

मुंबईमधील धोकादायक इमारतींसाठी महापालिका राबवणार वेगळे धोरण  

मुंबई :  महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींबाबत योग्य ती कार्यवाही करणे सोपे  व्हावे,शिवाय ही प्रक्रिया अधिक गतिशील व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या धोरणाला मंजूरी दिली आहे .

या धोरणानुसार, एखादी इमारत धोकादायक घोषित करण्याची कार्यपद्धती, तसेच याबाबत अधिक पारदर्शकता जपण्यासाठी संबंधित मालक आणि रहिवाशांना कार्यवाहीच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती देणे इमारत आणि कारखाने खात्याला बंधनकारक करण्यात आले आहे.

धोकादायक इमारतीच्या स्थितीबाबत तांत्रिक मतभेद असल्यास अपील करण्यासाठी यापूर्वी केवळ एकच समिती होती. मात्र ही प्रक्रिया गतिशील करण्याच्या दृष्टीने आता खासगी इमारतींसाठी चार  तर महापालिकेच्या इमारतींसाठी एक  समिती, यानुसार एकूण पाच  समित्या स्थापन  करण्यात येणार आहेत.

हे प्रस्तावित धोरण महापालिकेच्या वेबसाईटवर  उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 10 डिसेंबर 2017 पर्यंत त्यावर मुंबईकरांना आपल्या सूचना नोंदवता येणार आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More