मुंबईत 1,463, पुण्यात 832 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,25,197 वर – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,463, पुण्यात 832 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,25,197 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. गुरुवारी आढळलेल्या 7 हजार 539 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 16 लाख 25 हजार 197 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 198 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 42 हजार 831 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 16 हजार 177 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 31 हजार 856 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 50 हजार 011 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 1 हजार 463 नवे रुग्ण आढळले, तर 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 47 हजार 332 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 961 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 1 हजार 289 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2 लाख 16 हजार 558 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 41 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 17 हजार 608 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 600 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 832 रुग्णांपैकी 369 रुग्ण हे पुणे शहरातील असून 182 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 58 हजार 756 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 86 हजार 296 इतकी झाली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 1,463, पुण्यात 832 नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,25,197 वर

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. गुरुवारी आढळलेल्या 7 हजार 539 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

…अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू, शीळफाटा रोडवरील वाहतूक कोंडीप्रकरणी मनसेच्या आमदाराने दिला अल्टिमेटम

कल्याण – सर्वसामान्य नोकरदारांसाठी लोकल सेवा सुरू नसल्याने रस्ते वाहतुकीत अनेकांचा वेळ वाया जात आहे. त्यातच, कल्याण-शीळ रस्त्यावर गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. चाकरमन्यांचा...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश राजकीय

निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका, नरेंद्र मोदी-राहुल गांधी एकाच दिवशी बिहारमध्ये येणार

पाटणा –  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांना उत आला आहे. ऐन कोरोना काळातही निवडणुका होत असल्या तरीही राजकीय नेत्यांनी लोकशाहीच्या या उत्सावात उत्साहाने सहभाग घेतलाय....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज नव्या साडेसात हजार कोरोना रुग्णांची नोंद, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड लाखांवर

मुंबई – राज्यात आज 7 हजार 539 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16 हजार 177 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 14लाख 31...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

सीबीआय चौकशीसाठी आता राज्य सरकारची पूर्वसंमती घेणे आवश्यक – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – महाराष्ट्र राज्यात यापुढे सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याबाबतचे आदेश...
Read More