मुंबईत 10,428, पुण्यात 10,907 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर – eNavakal
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत 10,428, पुण्यात 10,907 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात बुधवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 59,907 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 322 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 30,296 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31,73,261 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 56,652 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 26,13,627 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,01,559 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 10,428 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 23 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 6,007 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 4,82,760 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,851 इतका झाला आहे, तर सध्या 81,886 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल 10,907 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 6,04,037 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 62 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 10,402 इतका झाला आहे. तसेच काल 7,832 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 5,09,278 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 84,526 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

सचिन वाझेंच्या पत्रावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर आता निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सचिन वाझे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

दैनंदिन रुग्णवाढीचा नवा उच्चांक; 24 तासांत तब्बल 1,26,789 नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली – राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असतानाच देशभरातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. आता तर देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे मुंबईत निधन

मुंबई – गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारे गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी (7 एप्रिल) दुःखद निधन झाले. ते 71 वर्षांचे होते....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

कोरोनाचा उद्रेक! आता ‘या’ शहरातही नाईट कर्फ्यू

मुंबई – देशात सध्या कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्व राज्यांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. आता महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातपाठोपाठ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्चला कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज सकाळी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांनी लसीचा...
Read More