मुंबईत १,५६६, पुण्यात २६९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७,१९० वर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १,५६६, पुण्यात २६९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४७,१९० वर

मुंबई – देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. शनिवारी राज्यात नव्या 2 हजार 608 रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर पोहोचली आहे. तर राज्यात काल दिवसभरात 821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 13 हजार 404 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 32 हजार 201 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 566 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 28 हजार 817 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात एकूण 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 949 झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. काल पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये २६९ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ३४६ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ७ जणांनी आपला जीव गमावल्याने येथील कोरोनाबळींची संख्या २६४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, काल राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 577 वर पोहोचला आहे. काल मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत 40, पुण्यात 14, सोलापुरात 2, वसई-विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाणे 1 आणि नांदेडमध्ये 1 मृत्यू झाला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लॉकडाउन 4.0 : आता पुढे काय करणार? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लॉकडाउनच्या चारही टप्प्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More
post-image
ट्रेंडिंग देश महाराष्ट्र

‘या’ विशाल चिखलात लपलेला जीव तुम्ही शोधू शकता का?

जगावर कोसळलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी शेकडो देश लॉकडाऊन असल्याने सध्या करोडो नागरिक आपापल्या घरातच आहेत. भारतातही मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More