मुंबईत हवामान दुषित! ‘प्रजा’चा अहवाल – eNavakal
News मुंबई

मुंबईत हवामान दुषित! ‘प्रजा’चा अहवाल

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हवामान दुषीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे 2018 मधील 279 दिवसांपैकी एकदाही मुंबईच्या हवेचा स्तर अत्यंत चांगला नव्हता प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरुन घेतलेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढल्याचे प्रजा फाऊंडेशनने आज एका पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मुंबईतील हवामान आणि सामाजिक समस्यांवर आधारित अहवाल प्रजाने मंगळवारी जाहीर केला. या अहवात धक्कादायक माहिती उजेडात आली मंडळाच्या संकेतस्थळावर 2018 मध्ये 279 दिवस मुंबईतील हवा दुषीत होती. त्यामध्ये हवेच्या स्तराची 86 दिवसाची माहितीच नव्हती त्या तुलनेत 2017 मध्ये 45 आणि 2016 मध्ये 65 दिवस मुंबईतील हवा चांगली होती, असे दिसून आले आहे. 2018 मध्ये मुंबईतील हवा 138 दिवस समाधानकारक होती. तर 2017 मध्ये 134 आणि 2016 मध्ये 177 दिवस मुंबईतील हवा समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच 2018 मध्ये मुंबईतील हवा 125 दिवस मध्यम स्वरुपाची होती. 2017 मध्ये 144 दिवस आणि 2016 मध्ये 107 दिवस मुंबईची हवा मध्यम स्वरुपाची होती, असा निष्कर्षही या अहवालातून काढण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचे सूचक प्रजाने दर्शवले आहे.तसेच पालिकेकडे येणार्‍या तक्रारींच्या संख्येत दोन वर्षात सुमारे पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2016 मध्ये तक्रारींची संख्या 81, 555 होती. तर 2018 मध्ये 1 लाख 16 हजार 658 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी सोडविण्यासाठी सरासरी 46 दिवसांचा कालावधी लागला. पालिकेच्या कामावर मोठ्या संख्येने नागरिक असंतुष्ट आहेत असे अहवालातून स्पष्ट झाले आहे तक्रार नोंदवताना कौन्सिलर कोड भरण्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असताना नगरसेवक आणि प्रशासन दोघांकडूनही त्याकडे दुर्लक्ष होते असून 2018 मध्ये 76 टक्के प्रकरणे रीतसर भरलेली नाहीत महिला सक्षणीकरण, महिला सुरक्षा यावर मोठमोठ्या गप्पा झोडल्या जात असताना त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहांकडे लक्ष पुरविले जात नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More
post-image
देश

दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्याला दारूची वाहतूक करताना अटक

नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन काळात बेकायदेशीर दारूची वाहतूक करताना अनेकांना पकडण्यात आले आहे. मात्र आज दिल्ली पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अशा बेकायदा...
Read More
post-image
देश

गोव्यात मासेविक्री करण्यास परवानगी

पणजी – लॉकडाऊनमुळे गोव्यात एक महिनाभर मासेविक्री बंद करण्यात आली होती. मात्र आता संपूर्ण राज्यात गोवा सरकारने मासेविक्री करण्यास परवानगी दिली आहे. मासेविक्री करताना...
Read More