मुंबईत वाढले कोरोनाचे 4 हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचे घरही कोरोनाच्या विळख्यात – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत वाढले कोरोनाचे 4 हॉटस्पॉट, मुख्यमंत्र्यांचे घरही कोरोनाच्या विळख्यात

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 690 वर जाऊन पोहोचली आहे. तर एकट्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 450 झाली आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचे चार हॉटस्पॉट होते. आता त्यामध्ये वाढ होऊन आणखी नवे चार हॉटस्पॉट तयार झाले आहेत. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रे पूर्व येथील कलानगरचा परिसरही कोरोनाग्रस्तांना हॉटस्पॉट ठरला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहत असलेला परिसर महापालिकेच्या ‘एच ईस्ट’ वॉर्ड विभागात येतो. येथील कलानगर, गव्हर्नमेंट कॉलनी, भारत नगर आदी परिसर कोरोनाग्रस्तांचे हॉटस्पॉट ठरले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारमधील अनेक मंत्री राहत असलेल्या महापालिकेच्या ‘डी वॉर्ड’ विभागातील कमला नेहरू पार्क, मलबार हिल बेलासिस चाळी आदी हे परिसर कोरोनाग्रस्तांचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या भागात 26 कोरोनाग्रस्त सापडले आहेत.

बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रख्यात असलेले कस्तुरबा हॉस्पिटल आणि त्याच्या बाजूचा परिसर, जिजामाता उद्यान आणि जे. जे. हॉस्पिटल परिसर असलेला महापालिकेचा ‘ई वार्ड’सुद्धा कोरोनाग्रस्तांचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागात तब्बल 44 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या के वेस्ट वॉर्डमधील अंधेरी – हे परिसरही कोरोनाग्रस्तांचे हॉटस्पॉट ठरले आहेत. येथे तब्बल 37 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

यापूर्वी वरळी परळ एस टी डेपो, वरळी गाव, शांतीनगर हा महापालिकेचा ‘जी साऊथ’ हा वॉर्ड कोरोना ग्रस्तांचा सर्वात मोठा बाधित विभाग ठरला होता. येथे तब्बल 68 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यानंतर महापालिकेच्या पी नॉर्थ येथील दिंडोशी, जोगेश्वरी, गुंदवली, विजयनगर, एअरपोर्ट, सहार व्हिलेज हे परिसरही हॉटस्पॉट ठरले होते. त्याखालोखाल महापालिकेच्या एम वॉर्डातील चेंबूर, टिळक नगर हे विभागही कोरोनाग्रस्तांचा हॉटस्पॉट ठरला होता. या नव्याने वाढलेल्या चार कोरोना हॉटस्पॉट मुळे राज्याच्या आणि महापालिकेच्या आरोग्य खात्याची जबाबदारी प्रचंड वाढली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

साताऱ्यात २४ तासांत २७ जण कोरोना पॉझिटिव्ह; तर दोघांचा मृत्यु

सातारा – सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २७जण पॉझिटिव्ह आल्याने आता कोरोनाबाधितांचा आकडा ३३६ वर पोहचला आहे. तसेच या कालावधीत वाई तालुक्यातील दोन कोरोनाबाधीत...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More