मुंबईत पुन्हा अग्नितांडव; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू – eNavakal
मुंबई

मुंबईत पुन्हा अग्नितांडव; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

मुंबई – कमला मिल आगप्रकरण ताजे असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा भीषण अग्नितांडवात चार जणांचा बळी गेला आहे. अंधेरीमधील मरोळ परिसरातील मैमून मंझिल या इमारतीच्या चौथ्या मजल्याला बुधवारी रात्री दोनच्या सुमाराच भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मध्यरात्री दोनच्या सुमारास कपासी कुटुंबाच्या रुम नंबर 603ला भीषण आग लागली. या आगीत कपासी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर ९ जण जखमी आहेत. मृतांमध्ये १ पुरुष, १ महिला तर दोन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी या ६ जणांना आगीतून बाहेर काढले. दाऊद अली कपासी (८०), तस्लीम अपासी कपासी (४२), सकीना अपासी कपासी (१४) आणि मोहीन अपासी कपासी (१०) अशी मृतांची नावे आहेत. कपासी कुटुंबीयांचा आगीत दुर्देवी अंत झाला तर शेजारचे कोठारी कुटुंबीय जखमी आहेत. इब्राहिम कोठारी, सकीना कोठारी, हुसेन कोठारी, हजीफा कोठारी आणि झारा कटलरीवाला अशी जखमींची नावे आहेत.
दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना करण्य़ात आल्या होत्या. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More