मुंबईत पाणी तुंबलेच नाही, महापौरांचा अजब दावा !  – eNavakal
News राजकीय

मुंबईत पाणी तुंबलेच नाही, महापौरांचा अजब दावा ! 

मुंबई – मुंबईत कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात  पाणी साचले होते. परिणामी मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मते मुंबईला कुठेही ब्रेक लागला नाही. मुंबईत कुठेच पाणी साचले नाही असा अजब दावा विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले असल्याचे सांगत त्यांची पाठ थोपटली आहे. ‘करून दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’, अशी खरमरीत टिका भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली आहे.
मुंबईत कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. तरीही यावेळी मुंबईत कुठेही पाणी तुंबल नाही, मी सकाळापासून मुंबईत फिरतोय पण मला कुठेही पाणी तुंबलेले दिसले नाही. काही ठिकाणी पाणी थोडसं साचलं होतं पण ते काढून टाकण्यात आलं अस महापौर म्हणाले. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत असेही त्यांनी सांगितले.

पाणी साचल्यामुळे मुंबईतल्या महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. नेहमीप्रमाणे हिंदमाता, सायन, चेंबूर, कुर्ला, खार, मिलन सबवे या सखल भागात पाणी साचले. त्याचे फोटो आणि व्हिडीओही ही लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र असे असतानाही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी साचलचं नसल्याचा अजब दावा केला आहे.
दरम्यान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याने शिवसेनेला टोला लगावला आहे. मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यावर प्रतिक्रिया देत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, ‘करून दाखवणाऱ्यांंनी पळून दाखवलं.’ मुंबई, कोकण शिक्षक पदवीधर  निवडणुकीसाठी आमदार आशिष शेलार मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, ‘गेल्या १५-२० वर्षांनंतर भाजपा या निवडणुकीत उतरले आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तसेच मुंबईसह राज्यात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे, त्याचा परिणाम मतदानावर होत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी पावसानंतर ‘पळून दाखवलं’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More