मुंबईत दहीहंडीसाठी मुंबई पोलीस सज्ज! 40 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात – eNavakal
News मुंबई

मुंबईत दहीहंडीसाठी मुंबई पोलीस सज्ज! 40 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

मुंबई – शुक्रवार आणि शनिवारी साजरा होणार्‍या गोकुळाष्टमी, दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून शहरात 40 हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या नियमांचे दहिहंडी पथकाने पालन करुन पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये, असे आवाहनही पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी केले आहे.
मुंबई शहरात शुक्रवारी 23 ऑगस्टला गोकुळाष्टमी आणि 24 ऑगस्टला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. या सण उत्सवात तसेच शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून 40 हजार पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांसोबत सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण कक्ष, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, होमगार्डसह वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. जुहू येथील हरे राम हरे कृष्णा मंदिरासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दहिहंडी आणि गर्दीच्या ठिकाणी सुक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्हीद्वारे निगराणी ठेवली जात आहे. तसेच गर्दीचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशातील पोलिसांना तिथे तैनात
करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More