पेट्रोल-डिझेल वाढीमुळे जीवनावश्यक वस्तू होणार महाग – eNavakal
News जीवनावश्यक मुंबई

पेट्रोल-डिझेल वाढीमुळे जीवनावश्यक वस्तू होणार महाग

नवी मुंबई – कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.  त्यामुळे मुंबईत आताच्या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधून मुंबईच्या विविध भागात पिक अप व्हॅन आणि टेम्पोने भाजीपाला, फळे आणि कांदा, बटाटा नेण्यात येतो. या सर्व मार्गांच्या सध्या असलेल्या भाड्यात 20 ते 30 टक्के वाढ होणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिरडी आंदोलन करण्यात आले.

डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. यामुळे आता आपल्याला भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे. येत्या शुक्रवारी ही भाडेवाढ होणार असल्याने याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होणार आहे. भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा, अन्नधान्य यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. दुसरीकडे वाढलेले भाडे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

येत्या शुक्रवारी मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघाची बैठक होणार आहे. यात 20 ते 30 टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. पेट्रोलजन्य पदार्थांबरोबर इन्शुरन्स, टायर किंमती वाढल्या असून चालकांचे पगारही वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

आजपासून पुणे परिवहनच्या बसेसचा सीएनजी पुरवठा बंद

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी)चा पुरवठा आज 24 मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

विकिलीक्सच्या असांजेवर आणखी १७ गुन्हे दाखल

वॉशिंटन – अमेरिकेने विकिलीक्सचे प्रकाशक जूलियन असांजेवर गुप्‍त माहिती अधिनियम अतंर्गत 17 नवे आरोप लावले आहेत. अमेरिकेने युकेकडून असांजेच्या प्रत्यापर्णणाची मागणी केली आहे. लंडनच्या बेलमार्श...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More