मुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणी कपात – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत उद्यापासून 10 टक्के पाणी कपात

मुंबई -मुंबई महानगरपालिका प्रशासनाने  १ नोव्हेंबर पासून ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबई शहरातील नागरिकांना सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करावी अशी सूचना केली आहे. त्याबाबतचे निवेदन आज स्थायी समितीच्या पटलासमोर सादर करण्यात आले. यानुसार, ही पाणी कपात गुरुवार १५ नोव्हेंबरपासून लागू केली जाणार आहे.

मुंबईत दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो. या नंतर ऑक्टोबर महिन्यात पाण्याचा साठा पाहून पाण्याचे नियोजन केले जाते. मुंबईला वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. यावर्षी १ ऑक्टोबरला १३ लाख १७ हजार ८१९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. हा पाणीसाठा मागील वर्षापेक्षा ९ टक्के इतका कमी आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या आढावा बैठकीत १ नोव्हेंबरपासून सरसकट १० टक्के इतकी पाणीकपात लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. नागरिकांचे १० टक्के पाणीकपात करताना पाण्याच्या वेळेतही १५ टक्के कपात करण्यात करण्याचे सुचवले आहे. ही १० टक्के पाणीकपात ठाणे आणि भिवंडीलाही लागू असणार आहे. याबाबतचे निवेदन स्थायी समितीत सादर करण्यात आले. मात्र स्थायी समितीची बैठक केंद्रीय मंत्री अनंतकुमार व जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. यामुळे पुढील बैठकीत पाणी कपातीवर चर्चा करून नंतर पाणी कपात लागू करण्याचा निर्णकाय घेण्यात येईल असे स्थायी समिती आद्यसख यशवंत जाधव सांगितले. मात्र ही पाणी कपात गुरुवार १५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही तर मुंबईकरांची फसवणूक – 
मुंबईत ऑक्टोबरपासून छुपी पाणीकपात लागू आहे. ही बाब आम्ही एक महिना आधीपासून सांगत होतो. प्रशासन १० टक्के म्हणत असले तरी २५ टक्के पाणी कपात लागू आहे. तसेच पाण्याच्या वेळेत १५ टक्के कपात केली असली तरी पाऊण तास कपात असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले. पाणीकपातीचा मुंबईकरांना त्रास होणार आहे. पालिका प्रशासन मुंबईकरांची फसवणूक करत आहे असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

दहा जिल्ह्यातून प्रवास करून ते सहाजण पोहचले गावाला

वर्धा – भारतातील सर्व राज्य आणी जिल्ह्यांच्या सीमा बंद असूनही तब्बल दहा जिल्ह्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून सहा मजूर आपल्या गावी पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईत ५२६ कोरोनाग्रस्त, ३४ जणांचा मृत्यू

मुंबई – जगभरातील शेकडो देशांमध्ये थैमान घ्यालणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतातही दहशत आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. देशात सध्या 4,281 कोरोनाग्रस्त असून बळींचा आकडा...
Read More
post-image
महाराष्ट्र

सीईटी बरोबर विद्यापीठाच्या परीक्षा होणार – सामंत

मुंबई – राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्या अखत्यारीतील महाविद्यालयीन परीक्षेसह सीईटी परीक्षा होणारच आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती...
Read More
post-image
देश

तबलिगी जमातच्या संपर्कातील दीड हजार जणांना कोरोना संसर्ग

नवी दिल्ली – देशातील कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 4 हजार 67 इतकी झाली आहे. त्यात तबलिगी जमातच्या संपर्कात आलेल्या दीड हजार जणांचा समावेश आहे....
Read More
post-image
देश

सॅनिटायझरच्या उत्पादन वाढीसाठी उत्तर प्रदेशात 55 कंपन्यांना परवाने

लखनऊ – कोरोनाचे संक्रमण थोपवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचे उत्पादन वाढावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 55 कंपन्यांना नवीन परवाने दिले आहेत. या कंपन्या रोज जवळपास 70...
Read More