मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला; ढिगाऱ्यातून १७ जणांना बाहेर काढले – eNavakal
मुंबई

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला; ढिगाऱ्यातून १७ जणांना बाहेर काढले

मुंबई – फोर्ट येथे क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या युसूफ इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या १७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून यापैकी काहीजण जखमी असल्याचे समजते आहे. क्रॉफर्ड मार्केटजवळील मंगलदास रोडवर लोहार चाळ येथे ही युसूफ नामक तळमजला अधिक चार मजली इमारत आहे. काल रात्री सव्वा नऊच्या सुमारास इमारतीच्या उत्तरेकडील काही भाग कोसळला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला असून आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More