मुंबईत अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाईसाठी ‘उपद्रव शोधक पथक’ तयार – eNavakal
News मुंबई

मुंबईत अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाईसाठी ‘उपद्रव शोधक पथक’ तयार

मुंबई,- मुंबईत अस्वच्छता कारणा़र्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी असलेल्या उपद्रव शोधक पथकाचे (एनडी टीम)महत्त्व कमी करून क्लीन अप मार्शल योजना राबवणार्‍या महापालिकेनं पुन्हा एकदा उपद्रव शोधक पथकाला सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन अप मार्शल योजना राबवली जाणार असून ज्या उपद्रव शोधकांच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्या त्वरित भरल्या जाणार आहे. त्यामुळे हे एनडी आता रस्त्यांवर उतरुन मुंबईतील दुकानदार, मार्केट, तसेच सार्वजनिक ठिकाणी दंडात्मक कारवाई करताना दिसणार आहेत.

मुंबईतील 24 प्रभागांमध्ये प्रत्येकी 8 त 10 जणांचं पथक असून गेल्या काही वर्षांत या पथकाकड़े दुर्लक्ष झाल्यामुळे यातील अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही पदेच भरली गेली नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी क्लीन अप मार्शल यांची नियुक्ती करण्यासाठी आता निविदा अटींमध्ये सुधारणा केली जात आहे. क्लीन अप मार्शल बरोबर आता उपद्रव शोधक पथकावरही अधिक जबाबदारी सोपवली जाणार आहे. यासाठी उपद्रव शोधक पथकाच्या ज्या रिक्त जागा आहेत, त्याही आता भरल्या जाणार आहेत. क्लीन अप मार्शल योजना राबवताना अस्वछता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. परंतु आपले उपद्रव शोधक पथकातील कर्मचारीही दंडात्मक करवाई करणार आहेत. विभागातील हे ’एनडी’ जिथे नागरिक, व्यापारी, दुकानदार, गाळेधारक कचरा करून अस्वछता करताना आढळून आल्यास त्यांच्यावर ते कारवाई करतील, असे शंकरवार यांनी स्पष्ट केलं.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

विरोधी पक्षातील गटनेत्यांची बैठक सुरू

मुंबई – राज्य विधीमंडळीचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक विधानसभेचे पक्षनेेते आणि कॉंग्रेसचे आमदार राधाकृष्ण यांच्या शासकीय निवास...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश; घोटाळ्यातील निवड यादी रद्द

नांदेड – नांदेडात घेण्यात आलेल्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठा घोळ झाला होता़. घोटाळ्याचे हे रॅकेट राज्यभर पसरले असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर घेतलेली लेखी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून ग्रेनेड...
Read More