मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा – eNavakal
महाराष्ट्र

मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई – पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल येथील कार्यालयास भेट दिली. मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा यावेळी ठाकरे यांनी घेतला.

ठाकरे यांच्या मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालय भेटीदरम्यान त्यांनी पश्चिम द्रूतगती महामार्ग, वरळी-शिवडी कनेक्टर, नरिमन पॉईंट – कफ परेड कनेक्टर, कलानगर उड्डाणपूल, धारावी टी जंक्शन ते पश्चिम द्रूतगती महामार्ग उड्डाणपूल या विकासकामांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त   आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगपालिकेचे अतिक्त आयुक्त पी. वेलारसू, एमएमआरडीएचे सहाय्यक महानगर आयुक्त बी. जी. पवार तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पश्चिम द्रूतगती महामार्गावरील दहिसर ते माहिमपर्यंत प्रस्तावित WEH रोड सरफेस अपग्रेड आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंट, टनेल, ब्रिजखालील अर्बन स्पेस यांचे काम लवकरच सुरू होत आहे. पश्चिम द्रूतगती महामार्गावर रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच तो हरित करण्याबाबत यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सूचना केल्या.

मुंबई महापालिका बांधत असलेला कोस्टल रोड आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरण बांधत असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण झाल्यानंतर वरळी-शिवडी कनेक्टर खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पांच्या प्रगतीची मंत्री ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

नरिमन पॉईंट- कफ परेड कनेक्टर हा प्रकल्प मच्छिमारांच्या बोटींना कसलाही अडथळा निर्माण होऊ न देता या व्यावसायिक व निवासी क्षेत्रातील वाहतूक सूलभ करेल. या प्रकल्पासाठीचे डिझाइन जूनपर्यंत तयार असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हे सर्व प्रकल्प मुंबईच्या प्रवास सुलभतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीचीही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी माहिती घेतली.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाच्या भेटीनंतर वांद्रे कुर्ला संकुल ते नंदादीप गार्डन, पश्चिम द्रृतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामाची स्थळपाहणी केली. यावेळी श्री. ठाकरे यांनी काम कशा पद्धतीने चालू आहे याची पाहणी करीत, हे काम करणाऱ्या कंत्राटदार तसेच या प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत संवाद साधला. या स्थळपाहणी दरम्यान प्रस्तावित धारावी टी जंक्शन ते नंदादीप उद्यान, पश्चिम द्रूतगती महामार्ग या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात देखील माहिती घेतली.

आदित्य ठाकरे यांनी कलानगर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. या कामांचा आढावा घेत असताना उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभिकरण, ग्रीन स्पेसमध्ये वाढ करणे, नंदादीप गार्डनचा विस्तार, प्रस्तावित कलानगर जंक्शन गार्डन आणि बीकेसी आर्ट डिस्ट्रिक्ट योजनांवरही चर्चा केली.

ही विकासकामे जोमाने सुरू असतानाच मुंबईतील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये ग्रीन स्पेस निर्माण करणे तसेच ती जागा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी तयार करणे, अशा जागांचा उपयोग खेळण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी एकंदरीतच मुंबईतील धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांना थोडासा विरंगुळा मिळू शकेल यासाठी व्हावा प्रयत्न करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई – पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल...
Read More
post-image
देश

विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलाहाबाद  – विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० दिवसांच्या पूर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

सोनू सूदच्या अवैध बांधकामप्रकरणी हायकोर्टानं राखून ठेवला निकाल

मुंबई – अभिनेता सोनू सुदला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. अवैध बांधकामप्रकरणी त्याला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे त्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली...
Read More
post-image
महाराष्ट्र

सरपंच आणि सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी उमराणे व खोंडामळी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द

मुंबई – नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे...
Read More