मुंबईतील खड्ड्यांवरून राजकारण तापले – eNavakal
News आघाडीच्या बातम्या आंदोलन मुंबई

मुंबईतील खड्ड्यांवरून राजकारण तापले

मुंबई – पावसाला सुरुवात झाली तशी खड्ड्यांची वाढती दुर्दशा देखील मुंबईकरांच्या अडचणीत भर घालत आहे. कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे ४ बळी देखील गेले आहेत. या सर्व परिस्थितीविरोधात काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल सुरु केला आहे. आज सायन सर्कल भागात काँग्रेसने शिवसेना आणि भाजप विरोधात आंदोलन केले. खड्डे बुजवून त्यावर कमळ लावून’ त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या. यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

मुंबईतील रस्त्याच्या या दुर्दशेसाठी महापालिका  जबाबदार असल्याने महापालिकेविरोधात देखील घोषणा देण्यात आल्या. महापालिकेचा हा निव्वळ कामचुकारपणा आहे असेही बोलले गेले. हातात पाटी घेऊन त्यावर शिवसेना भाजपाविरोधात घोषणा लिहिल्या होत्या. तसेच खड्डे असलेल्या ठिकाणी महापौराचे नाव देण्यात आले. एकंदरच खड्ड्यांवरून त्यास राजकीय वळण प्राप्त झाले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More