मुंबईतील एअर इंडिया इमारतीसाठी रिझर्व्ह बँकेची बोली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

मुंबईतील एअर इंडिया इमारतीसाठी रिझर्व्ह बँकेची बोली

मुंबई  – भारत सरकारच्या मालकीची एअर इंडिया ही हवाई प्रवासी वाहतूक करणारी कंपनी सध्या तोट्यात चालली आहे. हजारो कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी एअर इंडियाने गेल्या डिसेंबरमध्येच नरिमन पॉईंट येथील 23 मजली इमारत विकण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या इमारतीसाठी बोली लावली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक ही एअर इंडियाला 10 वर्षांचे भाडे आगावूच द्यायला तयार आहे.
यापूर्वी भारत सरकारचे अंगिकृत व्यवसाय असलेल्या लाईफ इन्शुरन्स कंपनी व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने एअर इंडियाची इमारत विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी 1300 कोटी रुपये खर्च करण्याची त्यांची तयारी होती. मात्र रिझर्व्ह बँकेने त्यांच्यापेक्षा जास्त पैशांची बोली लावली आहे. नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत विकण्यास एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांचा सक्त विरोध आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, या इमारतीतील अनेक मजले भाड्याने देण्यात आले आहेत. त्याच्या या भाड्यापोटी वर्षाला 130 कोटी मिळतात. ही 23 मजली इमारत वर्षाला 400 ते 500 कोटी रुपये कमवू शकते. जाहिरातींच्या माध्यमातून ही रक्कम मिळू शकते. अमेरिका व इतर देशात ही योजना यशस्वी झाली आहे. मात्र एअर इंडियाने ही इमारत फक्त भारत सरकारच्या उपक्रमांनाच विकण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्याच कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यात रिझर्व्ह बँकेचे पारडे जड आहे

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) एका छोट्या मुलीने जगभरात वादळ निर्माण केलंय आपण कधी जागृत होणारच नाही का?

मुंबईत बसणार्‍याला खूप उकडतंय, पुण्यात तर चटके असह्य होतायत, विदर्भ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतोय, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात चैत्रात पाऊस पडतोय, गारांचा मारा होतोय,...
Read More