मुंबई – भारतातील पहिल्या पी एम – ए एम अर्ध मॅरेथॉनचे आयआयटी मुंबई येथे १ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले. निरोगी आयुष्याबाबत दक्ष असणारे असंख्य नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक देवांग खख्खर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आणि अभिनेत्री प्रीती झांगियानी यांनी विशेष उपस्थिती लावली. मार्च 2019 पासून दांडी सॉल्ट चॅलेंजला सुरुवात होणार आहे. त्यात पदयात्रा, मॅरेथॉन आणि सायकलिंग अशा तीन उपक्रमांचा समावेश असणार आहे. गुजरातमध्ये मार्च २०१९ रोजी आयोजित दांडी सॉल्ट चॅलेंज समोरप होणाऱ्या उपक्रमांच्या मालिकेतील हा पहिला उपक्रम आहे.
ए एम – पी एम अर्ध मॅरेथॉनचे दोन भाग करण्यात आले आहे. पहिल्या भागात निरोगी आयुष्याबाबत दक्ष असणाऱ्या असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अर्ध-मॅरेथॉनचा पहिला टप्पा काल सुरू झाला, ज्यात धावपटूंनी २१ किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले. त्याचबरोबर आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास २१ किलोमीटर अंतर धावून पार करण्यासाठी सुरुवात केली आहे. गांधीच्या ऐतिहासिक दांडीयात्रेत त्यांची साथ देणाऱ्या ८१ पदयात्रींचे पूर्णाकृती पुतळे अर्ध मॅरेथॉनच्या अंतिम रेषेजवळ असतील आणि ते या धावपटूंना त्या ऐतिहासिक मोहिमेचे स्मरण करून देतील.