मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या ३२ महिन्यात ७६,४९१ तक्रारी – eNavakal
मुंबई

मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या ३२ महिन्यात ७६,४९१ तक्रारी

मुंबई – मुंबईतील दिवसेंदिस वाढत जाणाऱ्या अनधिकृत बांधकामांसोबतच त्यांच्या विरूधच्या तक्रारी देखील तिकत्या प्रमाणमात वाढत चालल्या आहेत, मागील ३२ महिन्यात एकूण ७६,४९१ अनधिकृत बांधकाम विरोधात तक्रारी नोंद झाल्या असल्याची गंभीर बाब माहिती अधिकारातून समोर येत आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता (अति.नि.) यांच्याकडून घेतलेल्या माहितीतून ही बाब स्पष्ट झाली. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणाली तयार केली होती, त्याच्या आधारे मुंबई महानगरातून तब्बल ७६,४९१ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या, पण वास्तविकता मुंबई महानगरपालिकेकडून फक्त 4866 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.

कमला मिल कंपाउंड, भानु फरसान मार्ट, हॉटेल सिटी किनारा, हुसैनी बिल्डिंग (भेंडी बाजार), साई सिद्धि बिल्डिंग (घाटकोपर) या अनाधिकृत ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे शेकडो मुंबईकरांचा जीव गेला होता. तरीही महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना संगनमताने घेऊन दरवर्षी हजारो बेकायदेशीर इमारतींचे बांधकाम केले जाते. असे मत शकिल शकील अहमद शेख यांनी मांडले. सहाय्य्क अभियंता यांच्याकडून मिळालेल्या मीहितीनुसार 1 मार्च 2016 पासून 19 ऑक्टोबर 2018 पर्यंत ऑनलाईन (RETMS) तक्रार प्रणालीवर एकूण ७६,४९१ तक्रारींची नोंद झाली आहे. यापैकी सर्वात जास्त तक्रारी (एकूण 7008) एल विभागात नोंदविल्या होत्या, मात्र फक्त एल विभागाकडून 182 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी प्रसार माध्यमांना दिली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More