मुंबईच्या लोकल मोटरमनचा संप तूर्तास स्थगित – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुंबईच्या लोकल मोटरमनचा संप तूर्तास स्थगित

मुंबई – आज सकाळपासून मध्य रेल्वेच्या मोटरमननी आंदोलन सुरू केले. आम्ही ओव्हरटाईम करणार नाही, असे मोटरमन संघटनेने ठामपणे सांगितले. यामुळे मध्य रेल्वे लोकलचे वेळापत्रक कोसळले. दुपारी आणि सायंकाळी मोटरमन संघटना आणि रेल्वे प्रशासनाची बैठक झाली, मात्र या बैठका फिसकटल्या. त्यानंतर पुन्हा बैठक घेण्यात आली. जवळपास 2 तास चाललेल्या बैठकीत ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 नवीन मोटरमनची भरती करण्याचे, सिग्नल ओलांडल्यावर होणार्‍या शिक्षा शिथिल करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकार्‍यांनी मोटरमनना दिले. त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या मोटरमनांनी घेतला.

मध्य रेल्वेच्या मोटरमनच्या रिक्त असलेल्या 230 जागा त्वरित भराव्यात, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करणे या मोटरमनच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मोटरमनने ओव्हरटाईम न करता केवळ नियमित काम करण्याचा पवित्रा घेतला होता. मुंबर्ईतील लोकलच्या मोटरमनच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. त्यांनी वेळोवेळी या मागण्या रेल्वे प्रशासनापुढे ठेवल्या. मात्र प्रशासन मुद्दाम या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वीही याच मागण्यांसाठी मोटरमननी दोनदा आंदोलने केली. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी त्यांनाच मारहाण केली. परिणामी आपल्या मागण्यांसाठी आपण आंदोलन केले तर प्रवासी मारतात आणि आंदोलन केले नाही तर प्रशासन दुर्लक्ष करते. या कात्रीत मोटरमन सापडले असून रेल्वे प्रशासन याचा गैरफायदा घेत आहे. मोटरमनच्या रास्त मागण्या असून त्यावर तोडगा का काढला जात नाही, असा सवाल विचारला जात आहे.

मोटरमन यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि मोटरमन यांच्या दुपारपासून सायंकाळपर्यंत दोन बैठका झाल्या. मात्र त्या बैठकाही निष्फळ ठरल्या. अखेर रात्री झालेल्या बैठकीत तोडगा निघाला. रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबर अखेर पर्यंत 50 नवीन मोटरमन भरण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच सिग्नल ओलांडल्यावर होणार्‍या शिक्षा शिथिल करण्याचा निर्णय घेतला. मोटरमनने आपला संप मागे घेतला असला तरी ठाणे स्थानकावर या संपाचा परिणाम जाणवला. ठाणे स्थानकावर तब्बल पाऊण ते एक तास लोकल उशिरा धावत असल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला. तसेच पंचवटी एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्नही केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, जेव्हा जेव्हा मोटरमन संप पुकारला तेव्हा तेव्हा नवाकाळ खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. आजच्या संपालाही नवाकाळने पाठिंबा दिला होता. मोटरमनला त्रास देऊन त्यांचे मानसिक खच्चिकरण प्रशासन करीत आहे. आताही 50 जागा भरण्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे, मात्र त्या कधी भरल्या जातील याबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. मोटरमनच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ‘नवाकाळ’ने केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More