मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाने शिरकाव केल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. त्यातच मरकजमध्ये सहभागी झालेले अनेकजण मुंबईत सापडल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आज राज्यात एकूण ८१ नवीन रूग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४१६ वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक रूग्ण संख्या मुंबईत आहे.तर, पुण्यात ६, पिंपरी चिंचवड मध्ये ३, अहमदनगर मध्ये ९, ठाण्यात ५ तर बुलढाण्यात एक रुग्ण आढळून आला आहे. राज्यात करोनामुळे एकूण १९ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याला दिलासा देणारी घटना घडली आहे. कोरोना बाधित एकूण ४२ जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

चिंता वाढतेय! २४ तासांत ३२४ रुग्ण सापडले, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

दरम्यान, दहिसरच्या आयसी इमारतीत एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच ही इमारत सील करण्यात आली आहे. तर, धारावीत ज्या इमारतीत कोरोनाचा रुग्ण सापडला ती इमारतही सील करण्यात आली आहे. शिवाय, धारावीतील प्रत्येकाची चाचणी करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आज कुठे किती कोरोना पॉझिटिव्ह सापडले?

 • मुंबई – 57
 • पुणे – 6
 • पिंपरी-चिंचवड – 3
 • ठाणे – 5
 • अहमदनगर – 9
 • बुलडाणा – 1
 • वसई – 1
 • हिंगोली – 1
 • महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?मुंबई – 238
  पुणे – 44
  पिंपरी चिंचवड – 15
  सांगली – 25
  नागपूर –  16
  नवी मुंबई – 13
  कल्याण – 10
  ठाणे – 8
  वसई विरार – 6
  पनवेल – 2
  उल्हासनगर – 1
  अहमदनगर – 17
  बुलडाणा – 5
  यवतमाळ – 4
  सातारा – 2
  कोल्हापूर – 2
  पालघर- 1
  गोंदिया – 1
  औरंगाबाद – 1
  सिंधुदुर्ग – 1
  रत्नागिरी – 1
  नाशिक – 1
  जळगाव- 1
  हिंगोली – 1

राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये घोषीत

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

ईदनिमित्त भाईजानकडून ५,००० कुटुंबांना अन्नदान

मुंबई – सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. त्याचा मोठा फटका बहुतांश मजुरांना बसला आहे. अशा संकटाच्या काळात ईदच्या दिवशी कुणीही उपाशी राहू नये. यासाठी अभिनेता...
Read More
post-image
अपघात

कोपरगाव -सिन्नरच्या सीमेवर ट्रकने चेकपोस्टला उडवले

शिर्डी – कोपरगाव -सिन्नर तालुक्यातील सीमेवर पाथरे फाटा येथे लावण्यात आलेल्या चेकपोस्ट जवळच्या तंबूत नाशिकहून भरधाव येणारा ट्रक काल रात्री घुसला आणि कर्तव्यावर असलेले...
Read More
post-image
मुंबई

केईएमच्या शवागृहाची विदारक स्थिती; मृतदेह ठेवायला जागाच नाही!

मुंबई – मुंबईत कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच केईएम रुग्णालयातील शवागृह मृतदेहांनी खचाखच भरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...
Read More
post-image
देश

न्यूझिलंडमधील माध्यम संस्था १ डॉलरला विकली

वेलिंग्टन – कोरोना महामारीमुळे उदयोग व्यवसाय संकटात आले आहेत. त्याचे परिणाम जगासमोर येऊ लागले आहेत. न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन माश्याच्या मृत्यूची संख्या वाढली

रत्नागिरी – कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या...
Read More