मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजेचा अहवाल मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजेचा अहवाल – eNavakal
आरोग्य देश मुंबई

मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजेचा अहवाल मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजेचा अहवाल

मुंबई –  मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयी काळजी करायला लावणारा अहवाल जेजे रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी मांडला आहे. देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज असल्याचं समोर आलं आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो.

मुंबईकर हे देशातील सर्वात दुःखी नागरिक असल्याचं केंद्राच्या अहवालात म्हटलं आहे. देशातील प्रथम श्रेणी शहरांशी तुलना करताना मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयीची माहिती समोर आली आहे. मुंबई (38 हजार 588), कोलकाता (27 हजार 394), बंगळुरु (24 हजार 348) या शहरांतील नागरिक सर्वाधिक मानसिक उपचार घेतात. विशेष म्हणजे, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड  झालं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेतात.

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार  आहे. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज आहे. घड्याळाच्या काट्यावर धावण्याची मुंबईकरांची सवयही याला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. जेजे हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीनं हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. 10 वर्षांच्या चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसोपचार घेण्यासाठी येतात. मात्र मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असल्याचंही यातून समोर येतं.

नव्याने उद्भवणारे डिसऑर्डर :

फेसबुक डिप्रेशन
सायबर बुलिंग
ऑनलाईन गेम अॅडिक्शन
बॉडी इमेज इश्यू

मुंबईकरांमध्ये दिसणारे मानसिक आजार

अँक्झायटी आणि ताणतणाव
नैराश्य
बायपोलर डिसॉर्डर
सायकोसिस
ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्डर (ओसीडी)
अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी)
डिमेन्शिया

मानसोपचार घेणारी टॉप 3 राज्यं

पश्चिम बंगाल – 2 लाख 75 हजार 578
महाराष्ट्र – 1 लाख 24 हजार 400
कर्नाटक – 1 लाख 16 हजार 771

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More