‘मी शिवाजी पार्क’ची ‘अमेरिका वारी’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

‘मी शिवाजी पार्क’ची ‘अमेरिका वारी’

मुंबई – मराठी चित्रपट फारसे चालत नाहीत अशी बोंब नेहमीचीच… पण उत्तम सिनेमा केवळ चालतोच असं नाही, तर तो जगभर प्रदर्शित होऊन चांगली कमाईही करतो. आता महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ सिनेमाचंच उदाहरण घ्या. ८ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने परदेशातही घौडदौड सुरु केली आहे.

येत्या १ नोव्हेंबरला जर्मनीतील म्युनिचमध्ये तर शनिवार ३ नोव्हेंबरला स्वीडनमध्ये, तर शुक्रवार २ नोव्हेंबर आणि शनिवार ३ नोव्हेंबरपासून तो अमेरिकेतील न्यू जर्सी, डल्लास, बे एरिया, फिलाल्डेफिया, पोर्टलॅण्ड, सियाटेल, अटलांटा, हॉस्टन या शहरांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. मराठीतील पाच दिग्गज कलाकार आणि तितकेच ताकदीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला चित्रपट परदेशातील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे हे नक्की…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

मुंबई महापालिका रुग्णालयांना होणारा औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई – आजपासून मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना होणारा औषधपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे रुग्णांना हाल सोसावे लागणार आहेत. ऑल फूड अॅण्ड लायसन्स होल्डर फाऊंडेशनने महापालिकेच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली इमारतीतील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More