मी महाराष्ट्रीयनच – अमिषा – eNavakal
मनोरंजन मुंबई

मी महाराष्ट्रीयनच – अमिषा

मुंबई- तसं पाहिलं तर मी महाराष्ट्रीयनच आहे. कारण माझी आजी पुण्यातील गोखले. बालपणी पुण्यात जायची तेव्हा अनेक मराठी नाटक मी आजीसोबत पाहिली आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे माझे खूप खूप खूप आवडते कलाकार… ऑल टाईम फेव्हरेट कलाकार. अजूनही मला जसा वेळ मिळतो मी मराठी सिनेमे बघते. माझ्या घरी अनेक मराठी सिनेमाच्या डीव्हीडी आहेत…  हे वक्तव्य कुणा मराठी नटीचे नाही, तर चक्क बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिचे आहेत… ‘लूज कंट्रोल’ या मराठी सिनेमाच्या म्युझिक रिलीज सोहळ्याला हजेरी लावत तिने आपले मनोगत व्यक्त केले. हा सिनेमा हिंदीत यायला हवा, अशी इच्छाही तिने व्यक्त केली. प्रेम झांगियानी प्रस्तुत आणि अजय सिंग दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या तीन मित्रांची कथा या सिनेमात दाखवण्यात आलेली यात मधुरा नाईक, अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांत केरकर, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, भालचंद्र कदम, आरती सोळंकी, टिया अथर्व, बिनोद राय बनतावा, बंटी चोप्रा, नम्रता आवटे, प्राजक्ता हनमगर, नम्रता कदम, अजय पुरकर, रामा नादगौडा, दीपिका सोनवणे, अंजली अत्रे, पूजा केसकर, अंजली धारू, विकास वाघमारे, उमेश जगताप, प्रवीण खांडवे अशी मोठी स्टारकास्ट आहे. पार्श्वसंगीत आशिष यांनी दिलंय तर सिनेमाचं कास्टिंग रोहन मापुसकर यांनी केलंय. संकलन उज्वल चंद्रा यांनी तर सिनेमटोग्राफी मर्जी पगडीवाला यांनी केलीय.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More