मी फक्त माध्यमांपासून दूर गेलो होतो – संजय राठोड – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

मी फक्त माध्यमांपासून दूर गेलो होतो – संजय राठोड

वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड हे अखेर १५ दिवसांनी समोर आले आहेत. ते आज पोहरादेवीत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी जगदंबा देवी तसेच सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ‘मी १४ दिवस नाही, तर फक्त १० दिवस माध्यमांपासून दूर गेलो होतो, पण मुंबईतल्या माझ्या फ्लॅटमधून माझं प्रशासकीय काम सुरूच होतं’, असे त्यांनी सांगितले.

संजय राठोड म्हणाले, ‘तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी १४ नाही तर फक्त १० दिवस माध्यमांपासून लांब होतो. प्रसारमाध्यमांमध्ये ज्या पद्धतीने या प्रकरणाची चर्चा होऊन माझी बदनामी होत होती. त्या पार्श्वभूमीवर माझ्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत, पत्नी आणि मुलांसोबत मी थांबलो होतो. त्यांना मी वेळ देत होतो. माझे वयोवृद्ध आई-वडील आहेत. माझ्या पत्नीलादेखील ब्लड प्रेशर आहे. या काळात माझं कुटुंब सांभाळण्याचं काम मी करत होतो’, असे ते म्हणाले. त्याचबरोबर आपण आजपासून पुन्हा नियमित कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यातून सत्य काय ते समोर येईलच. त्यामुळे आजपासून मी पुन्हा नियमित कामाला सुरुवात करणार आहे’, असे राठोड यांनी म्हटले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News विदेश

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत ब्रिटनमध्ये बंदी

लंडन- ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 17 मेपर्यंत बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कुख्यात गुंड रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई- कुख्यात गुंड रवी पुजारीला आज कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी...
Read More
post-image
देश

पाच राज्यांकडून पेट्रोल-डिझेलवर करकपात

नवी दिल्ली – दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि केंद्र व राज्य सरकारकडून...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

मी फक्त माध्यमांपासून दूर गेलो होतो – संजय राठोड

वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर

वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत...
Read More