‘मी जिवंत आहे तोपर्यंत कांद्याचा भाव कमी होऊ देणार नाही’ – पवार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

‘मी जिवंत आहे तोपर्यंत कांद्याचा भाव कमी होऊ देणार नाही’ – पवार

अकोला – ‘मी जिवंत आहे तोपर्यंत कांद्यांचा भाव कमी होऊ देणार नाही’, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी आज सकाळी विधासभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अकोल्याच्या बाळापूर येेथे प्रचार सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मी कृषी मंत्री असताना कांद्यांचा वाढीव भाव देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजपच्या खासदारांनी विरोध करत माझ्यावर महागाई वाढवल्याचा आरोप केला. त्यांनी गळ्यात कांद्यांच्या माळा घालून लोकसभेत विरोध केला. त्यावेळी मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो, ‘शेतकर्‍याच्या कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. शेतकर्‍यांच्या कष्टाचे आणि घामाचे पैसे मिळले पाहिजे’, असे सांगितल्याचे पवार म्हणाले.

‘भाजप सरकारने शेतकर्‍यांना हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांना हमीभाव दिलाच नाही. सरकारने आपले आश्‍वासन पूर्ण केले नाही. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात उभे केलेले उद्योग आणि कारखाने भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बंद झाले, लोकांचे रोजगार गेले. जेट एअरवेजकडे 2050 विमाने होेती. ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी होती. ती ही बंद झाली. 20 हजार कर्मचारी बेरोजगार झाले. सरकारने या कंपनीकडे दुर्लक्ष करुन मदत केली नाही, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका रात्रीत नोटबंदी केली. काय माणूस आहे. संपुर्ण देशाला बँकांबाहेर रांगेत उभे केले’, अशी घणाघाती टीका मोदी सरकारवर शरद पवारांनी केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More