मीरा-भाईंदर पालिकेकडून न्यायालाच्या आदेशाला केराची टोपली – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

मीरा-भाईंदर पालिकेकडून न्यायालाच्या आदेशाला केराची टोपली

मीरा भाईंदर – आज सकाळी स्थायी-समिती सभापती रवि व्यास आणि महिला व बाल कल्याण समिती सभापती दीपिका आरोरा यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, या उद्घाटनादरम्यान सत्ताधारी भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्यावर वरांड्यातच फटाके फोडले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या फटक्यासंदर्भातील निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.

आज, सोमवारी सकाळी मीरा-भाईंदर येथे शासकीय कार्यालयात स्थायी-समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दुसऱ्या मजल्याच्या वरांड्यातच फटाके फोडले. त्यामुळे शासकीय कार्यालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पालिकेच्या प्रवेशद्वारावर पाच ते सहा सुरक्षा रक्षक असूनसुद्धा पालिकेत फटाके आणले जातात, यावर शंका घेतली जात आहे.

महापालिकेमध्ये फटाके फोडले यात काहीच वावगे नाही, कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात फटाके फोडले, त्यामुळे या गोष्टीचा उहापोह करू नये, असे मीरा-भाईंदरच्या महापौरांनी सांगितले, त्यामुळे पालीकेत स्फोटक पदार्थ कोणी घेऊन गेले तरी कोणाला कळणार नाही, असं स्थानिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More
post-image
देश

सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

मुंबई – आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर दिब्रिटोंच्या निवड, विहिंपकडून विरोध

उस्मानाबाद – 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. याला विश्व हिंदू परिषदेने...
Read More
post-image
देश विदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी पुन्हा मध्यस्थीची तयारी दाखवली

न्यूयॉर्क – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नी भारत आणि पाकिस्तानात मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही...
Read More