मियोमीरला नमवून रॉनिक उपांत्य फेरीत – eNavakal
News क्रीडा विदेश

मियोमीरला नमवून रॉनिक उपांत्य फेरीत

इंडियान वेल्स – कॅनडाच्या मिलॉस रॉनिकने सर्बियाच्या मियोमीर केसमा ओनिचचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून इंडियाना वेल्स आंतरराष्ट्रीय मास्टर्स टेनिस स्पर्धेची पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. रॉनिकने ही लढत सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-3 अशी आरामात जिंकली. अवघ्या 72 मिनिटांत रॉनिकने 19 वर्षीय मियोमीरला सहज नमवले. यंदाच्या वर्षातील पहिल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतदेखील रॉनिकने मियोमीरला पराभूत केले होते.
इंडियाना वेल्स स्पर्धेत रॉनिकच्या तुफानी खेळासमोर मियोमीरला काही करता आले नाही. दोन्ही सेटमध्ये रॉनिकने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्याने प्रभावी फोरहॅन्ड, बॅकहॅन्ड फटक्यांचा छान वापर केला. 13 बिनतोड सर्व्हिसदेखील रॉनिकने केल्या. आता त्याचा मुकाबला डॉमनिक थिएमशी होईल. डॉमनिकचा प्रतिस्पर्धी फ्रान्सचा गाईल मॉनसिलसने दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे डॉमनिकला सामना न खेळताच उपांत्य फेरीत प्रवेश करता आला. गेले काही महिने गाईलला पायाच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. सामन्यापूर्वी सराव करताना पुन्हा एकदा गाईलच्या या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे त्याने सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या एटीपी स्पर्धेत मॉनसिलिसने सर्वाधिक 15 विजय नोंदविले आहेत. रॉनिक आणि डॉमनिक यांच्यात आतापर्यंत दोन लढती झाल्या. त्या दोन्ही लढती रॉनिकने जिंकल्या आहेत. 2016 नंतर पुन्हा एकदा हे दोघे आमनेसामने येत आहेत. रॉनिकने यंदाच्या वर्षातील पहिली ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा जिंकली होती.
महिला विभागात स्वीस संघाच्या ब्लेंडाने 5 वे मानांकन देण्यात आलेल्या कॅरोलिनाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ब्लेंडाने ही लढत 6-3, 4-6, 6-3 अशी जिंकली. याअगोदर तिने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ओकासाचादेखील पराभव केला होता. आणखी एका सामन्यात जर्मनीच्या कर्बरने 7 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या व्हिनस विल्यम्सला
चकित केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More