मित्रांसोबत मयत सर्पमित्र विक्रमसिंग मल्होतवरही गुन्हा दाखल – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे पर्यावरण महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

मित्रांसोबत मयत सर्पमित्र विक्रमसिंग मल्होतवरही गुन्हा दाखल

नाशिक – विख्यात सर्पमित्र विक्रमसिंग मल्होत यांच्या आठ मित्रांना आज पोलिसांनी अटक केली आहे. विक्रमसिंग यांचा नाशिकमध्ये ४ ऑक्टोबर रोजी सापाने चावा घेतल्याने मृत्यु झाला होता. त्यादिवशी विक्रमसिंग आपल्या मित्रांसोबत साप पकडण्याचे प्रात्यक्षित दाखवताना सापाच्या चावाने त्याचा मृत्यु झाला होता. सुत्रांच्या माहितीनुसार आता त्याच्या ४ सर्पमित्रांसह ८ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.

वन्यजीव कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खुद्द मयत विक्रम मल्होत यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम नाशिकला बाळु बोराडे यांच्या बंगल्यावर असताना साप पकडण्याचं प्रात्यक्षित दाखवत होता आणि त्यादरम्यान सापाने त्यांचा चावा घेतला. दरम्यान ज्या कोब्रा जातीच्या दुर्मिळ सापांच प्रशिक्षण विक्रम देत होता, तो साप विक्रमने कुठुन आणला आणि विक्रमसोबत असणा-या इतर मित्रांकडेदेखील असे काही दुर्मिळ साप आहेत का याचा तपास जोलिस घेत असल्याचे समजते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

अनंतनाग – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मागील २४ तासांत दुसरी चकमक झाली असून जवानांनी वघामा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या दहशतवादी हल्ला देश

काश्मीरमध्ये २४ तासांत ३ दहशतवादी हल्ले! १ जवान शहीद, १२ जखमी

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले मात्र एक जवान शहीद झाले. सोमवारी काश्मीरमध्ये ३ ठिकाणी चकमक झाली...
Read More