माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींवरून शिवसेना-भाजपात जुंपली – eNavakal
मुंबई

माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींवरून शिवसेना-भाजपात जुंपली

मुंबई – माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आलेले रहिवासी मरणयातना भोगत असून त्यांना तेथून बाहेर काढा. महापालिका त्यांना सुविधा देईल, परंतु प्रदूषणामुळे उद्भवणार्‍या आजारांपासून त्यांना मुक्ती कोण देणार असा सवाल करत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी यासर्व कुटुंबांना परत त्यांच्या जागांवर पाठवण्याची मागणी केली आहे. मात्र, भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी याचा समाचार घेत 24 विभागांमध्ये 24 प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी इमारती बांधण्याचं काम का हाती घेतलं नाही असा सवाल करत शिवसेनेला खिंडीत पकडलं. त्यामुळे आहे त्यांना तिथून बाहेर काढण्यापेक्षा नवीन कुटुंब तिथं जाणार नाही यासाठी आपण काय करणार आहोत ते आधी सांगा असा सवाल केला. त्यामुळे सत्ताधारी विरुध्द पहारेकरी यांच्यामध्ये यावरून चांगलीच जुंपली होती.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या समस्यांना हरकतीच्या मुद्दयाद्वारे वाचा फोडली. सात-सात मजली इमारतींमध्ये 15-15 दिवस विजेचा पत्ता नसतो. त्यामुळे पाण्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे वरच्या मजल्यांवर राहणार्‍या कुटुंबांना खाली येऊन धुणीभांडी करावी लागते. एवढंच काय तर कोणत्याही प्रकारच्या सुविधाही नाही. परंतु या सुविधा दिल्या तरी तेथे असलेल्या प्रदूषित वातावरणामुळे जे आजाराचं प्रमाण वाढत आहे, त्यापासून कोण वाचवणार असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे आम्हाला ही घरं नको, आम्हाला आमच्या जागांवर परत पाठवा, अशी मागणी होत आहे. याठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियमण मंडळाने केलेल्या पाहणीत केवळ 24 टक्केच प्रदूषण असल्याचं म्हटलं आहे, तर निरी सारख्या संस्थेनं याठिकाणी 200 टक्के प्रदूषण असल्याचा अहवाल दिला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More