माहीम येथे वयोवृद्धाच्या घरी साडेआठ लाखांची घरफोडी – eNavakal
News गुन्हे मुंबई

माहीम येथे वयोवृद्धाच्या घरी साडेआठ लाखांची घरफोडी

मुंबई- माहीम येथे वयोवृद्धाच्या घरी साडेआठ लाख रुपयांची घरफोडी करणार्‍या एका टोळीचा माहीम पोलिसांनी पर्दाफाश करुन तीन आरोपींना अटक केली. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. इतर दोन आरोपींमध्ये कार्तिक क्रिष्णा कौंडर आणि सुभाष सेल्वम देवेंद्र यांचा समावेश असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निलंकठ भगवंत राय (62) हे वयोवृद्ध माहीम येथील वीर सावरकर मार्ग, हिंदुजा हॉस्पिटलजवळील सिल्व्हर सँड अपार्टमेंटच्या दुसर्‍या मजल्यावर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. 4 मार्चला ते त्यांच्या घरात झोपले होते, यावेळी रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांच्या घरातील बेडरुममध्ये काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला होता. कपाटातील कॅश, सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळ आणि इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे साडेआठ लाख रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी पळवून नेला होता. सकाळी हा प्रकार निलंकळ राय यांच्या लक्षात येताच त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी माहीम पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यांच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध 454 457, 380, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच मंगळवारी माहीम रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद फिरणार्‍या तीन तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील एक तरुण सतरा वर्ष दहा महिन्यांचा असल्याने त्याला डोंगरी बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर इतर दोघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More