मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत ७५ जणांना नोटीस – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत ७५ जणांना नोटीस

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या १३१ प्राप्त तक्रारींपैकी ७५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. तर ५६ तक्रारी निकाली काढल्या आहेत. सर्वाधिक मावळ लोकसभा, विधानसभा मतदारसंघातून ३७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्वच तक्रारी खोट्या असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रारी नोंदविण्यासाठी अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी अॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करावा लागत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन, कर्जतमधून १, उरणमधून १५, मावळमधून ३७, चिंचवडमधून ७० आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अशा १३१ आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७५ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यांना नोटीसा पाठवून खुलासा मागितला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या टप्प्यात २३ एप्रिलला राज्यातल्या १४ मतदारसंघांत मतदान होणार आहे. यामध्ये जळगाव, रावेर,...
Read More
post-image
अपघात आघाडीच्या बातम्या देश

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ७ ठार ३४ जखमी

मैनपुरी – उत्तर प्रदेशमध्ये आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि बसच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#IPL2019 दिल्लीचा पंजाबवर सहज विजय

नवी दिल्ली – आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या दुसर्‍या लढतीत दिल्लीने पंजाबवर सहज विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबला १६३ धावांत रोखण्यात यश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई – मध्य, पश्‍चिम, हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, पश्‍चिम मार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान डाऊन जलद लाईनवर आज सकाळी 10.35...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) एका छोट्या मुलीने जगभरात वादळ निर्माण केलंय आपण कधी जागृत होणारच नाही का?

मुंबईत बसणार्‍याला खूप उकडतंय, पुण्यात तर चटके असह्य होतायत, विदर्भ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतोय, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात चैत्रात पाऊस पडतोय, गारांचा मारा होतोय,...
Read More