मावळमधून पार्थ पवारांना, शिरूरमधून अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मावळमधून पार्थ पवारांना, शिरूरमधून अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी दुसरी यादी जाहीर केली. मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत याबाबतची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (शुक्रवारी) दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमोल कोल्हे – शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, बजरंग सोनवणे- बीड, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपनं हा आपला विजय असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. यावर बोलताना शरद पवार यांनी भाजप-सेनेला घाबरून नाही तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यापूर्वी त्यांनी भाजपचा पराभव केला आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टिका केली. अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरुरमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात पडली आहे. नाशिकमधून समीर भूजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More