मावळमधील डान्सबारमध्ये गोळीबार; पीएसआय जखमी, दोन जण ताब्यात – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

मावळमधील डान्सबारमध्ये गोळीबार; पीएसआय जखमी, दोन जण ताब्यात

पिंपरी – पुणे जिल्ह्यातल्या मावळ येथील डान्सबारमध्ये दोन गटात वाद झाल्याने गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरिक्षक यामध्ये जखमी झाले आहेत. नितीन मोहिते असे जखमी पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मावळमधील फ्लेवर्स डान्स बारमध्ये बिल देण्यावरून दोन गटात वाद झाल्याने एकाला मारहाण करत गोळीबार करण्यात आला, अशी प्राथमिक माहिती मिळते. ही घटना शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी गेलेले पोलीस उपनिरिक्षक नितीन मोहिते यांच्या पायावर काहींनी गोळी झाडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोळीबार करणाऱ्यांच्या गटामध्ये ५ ते ६ जण असून यांपैकी २ आरोपींना पोलिसांनी पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. या आरोपींवर वडगाव मावळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत. राज्यसरकारने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर बारमधील कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य घडल्याची ही पहिलीच घटना आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More